पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात २४ लोकांच्या चाचणीनंतर मिळतो १ कोरोना पॉझिटिव्ह

डॉ. रमण गंगाखेडकर

भारतात २४ लोकांची तपासणी केल्यानंतर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिली आहे. जपानमध्ये सरासरी ११ लोकांच्या तपासणीनंतर १ संक्रमित आढळतो, इटलीत ६.७, अमेरिकेत ५.३ आणि ब्रिटनमध्ये ३.१ जणांच्या चाचणीनंतर १ रुग्ण आढळतो. त्यामुळे भारतात तपासणीचे प्रमाण वाढवण्याची गरज नाही. दुसऱ्या देशांच्या चाचण्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणाची तुलना करणे ठीक नाही, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने तपासणी किट किंवा तपासणीची संख्या कमी असल्याचा आरोप पुन्हा फेटाळला आहे. 

२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल

आयसीएमआरचे डॉ रमण गंगाखेडकर म्हणाले की, देशात कोरोना चाचणी किट्स सध्या ८ आठवड्यांसाठी पुरेसे आहेत. बुधवारपर्यंत देशात २,९०,४०१ लोकांची चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी ३० हजारहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. भारतात एका शिफ्टमध्ये ४२ हजार आणि दोन शिफ्टमध्ये दररोज ७८ हजार सॅम्पलची चाचणी करण्याची क्षमता आहे. 

५ लाख किट्स आले

डॉ. गंगाखेडकर पुढे म्हणाले की, ५ लाख नवी रॅपिड टेस्ट किट देशात आले आहेत. परंतु, त्याचा वापर सुरुवातीच्या चाचणीसाठी केला जात नाही. याचा वापर निगराणीसाठी केला जातो. हॉटस्पॉट परिसरातील ट्रेंड पाहण्यासाठी याचा वापर होईल. 

औषधांची पहिली खेप मिळाल्यानंतर ब्रिटनने मानले PM मोदींचे आभार

त्याचबरोबर याचा वापर निगराणीसाठी केला जाणार आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेत काही फरक नसेल, असे चीनमधून आलेल्या किटच्या खराब गुणवत्तेबाबत बोलताना त्यांनी सांगितले.