पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'देशात आतापर्यंत १ लाख २१ हजारहून अधिक जणांची तपासणी'

कोविड कीट (संग्रहित छायाचित्र)

देशभरातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा बुधवारी ५१९४ पर्यंत गेला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. याचदरम्यान, आयसीएमआरने आतापर्यंत १,२१,२७१ जणांची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. 

लॉकडाऊन १४ एप्रिलला संपवणे अशक्य, नरेंद्र मोदी यांचे सूचक विधान

रुग्णालयात या विषाणूचे संक्रमण होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जात असून ते रोखण्यासाठी उपायांचे पालन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशात कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे प्रकरण वाढत चालले आहे. अशावेळी आमची तयारीही त्याचवेगाने सुरु आहे. 

सुनील गावसकरांची ५९ शतके, कोरोनासाठी केली ५९ लाखांची मदत

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूचे एकूण ५१९४ प्रकरणे समोर आली आहेत. यात ४६४३ प्रकरणे ऍक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रात ११५८ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.