पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात आतापर्यंत ५ लाखांहून कोरोना टेस्ट, २१७९७ जणांना लागण

आयसीएमआरने गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत देशात कोरोनाच्या एकूण ५,००,५४२ चाचण्या झाल्याची माहिती दिली.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकर माजवला आहे. भारतातही तो वेगाने पसरत आहे. हळूहळू देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याचदरम्यान आयसीएमआरने गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत देशात कोरोनाच्या एकूण ५,००,५४२ चाचण्या झाल्याची माहिती दिली. 

राज्यातील हॉटेल्स, खानावळींचे किचन्स सुरु करा: राज ठाकरे

आयसीएमआरने म्हटले की, एकूण ४,८५,१७२ व्यक्तींचे परीक्षण करण्यात आले आहे. त्यात गुरुवारी सकाळपर्यंत २१,७९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

याचदरम्यान, देशात रॅपिड टेस्टिंग रोखण्यात आले आहे. चिनी किट खराब असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रॅपिड टेस्ट रोखण्यात आले आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली. 

राज्यातील हॉटेल्स, खानावळींचे किचन्स सुरु करा: राज ठाकरे

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत कोरोना संक्रमित ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत कोरोना विषाणूची १४०० नवी प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याचबरोबर दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही या विषाणूचा मोठ्याप्रमाणात फैलाव झालेला आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची देय रक्कम तूर्त स्थगित

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICMR said India tested more than 5 lakh samples of coronavirus total 21797 found covid19 positive