पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, ICMR कडून आवाहन

तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, असे आवाहन आयसीएमआरकडून करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. लस उपलब्ध नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन साथीच्या महारोगाला रोखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची नामुष्की ओढावली असून वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींसह पोलिस प्रशासन आणि इतर अत्यावश्यक वर्गातील मंडळी कोरोनाच्या लढ्यात प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या कष्टाला यश मिळवून देण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. 

कोरोनाविरोधातील लढा एकत्रित लढू, मोदी-ट्रम्प यांच्यात एकमत!

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनानंतर आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्वसामान्य नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवन करुन सार्वजनि ठिकाणी थुंकू नये. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असेही आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. 

कोविड-१९ : एकट्या मुंबईत एका दिवसांत ५२ रुग्ण, चार जणांनी गमावला जीव

गुटखा, तंबाखू, पान मसाला, पान आणि सुपारीचे सेवन केल्यानंतर तोंडात थुंकी जमा होते. या व्यसानामूळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तंबाखूजन्य सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारु नये, असा सल्ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून देण्यात आलाय. 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तीन हजारहून अधिक झाला आहे. यातील ७ ५ जणांचा आतापर्यं मृत्यू झाला आहे.  दोनशेहून अधिक लोक यातून सावरुन बरे झाले असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिलीय.