पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ: निकाल निराशजनक!. पण टीम इंडिया शेवटपर्यंत लढली: PM मोदी

नरेंद्र मोदी

मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडवरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली आहे. निकाल हा निराशजनक आहे, पण भारतीय संघाने शेवटपर्यंत संघर्ष केला, अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.

'भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही स्तरावर उत्तम कामगिरी केली. याचा आम्हाला अभिमान आहे. विजय आणि पराभव आयुष्याचा एक भाग असतो. भविष्याच्या प्रवासासाठी टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा!' असा उल्लेखही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. 

#INDvNZ : भारत आउट! न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र पहिल्या उपांत्य सामन्यात भारताच्या पदरी पराभव आल्याने विराटच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अधूरेच राहिले आहे. 

#INDvNZ Semi: जडेजाने ड्रेसिंगरुमचा माहोल बदलला, पण...

भारतीय संघाच्या पराभवानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच भारतातील क्रिकेट प्रेमींना आजचा निकाल हा धक्कादायक असाच आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 India vs New Zealand India batted bowled fielded well throughout we are very proud reaction pm Narendra Modi after India loss first semi final againest New Zealand