पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुप्तचर अधिकाऱ्याची हत्या चाकूने भोसकून; शवविच्छेदन अहवालात खुलासा

अंकित शर्मा

दिल्ली हिंसाचारा दरम्यान मृत्यू झालेल्या गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अंकित शर्मा यांची हत्या चाकूने भोसकून करण्यात आली आहे. अंकित यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूचे अनेक वेळा वार केले आहेत. बेदम मारहाण करुन चाकून भोसकून अंकित शर्मा यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. 

कोरोनाचा कहर, शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स १००० अंकानी कोसळला

गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांचा मृतदेह २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या चांदबाग परिसरातील एका नाल्यात सापडला होता. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात आला. त्यानंतर अंकित यांच्या मृतदेहावर गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या मूळगावी इटावा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकित शर्मा यांच्या अंत्यसंस्कारावेळी पोलिसांकडून सलामी देण्यात आली. अंकित शर्मा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. 

हिंसाचारानंतर एका भागातूनच गोळा केले २ हजार किलो विटांचे तुकडे

दरम्यान, अंकित शर्मा यांची हत्या आपचे नगरसेवक ताहिर हुसेन आणि त्याच्या समर्थकांनी केली असल्याचा आरोप अंकितच्या कुटुंबियांनी केला आहे. अंकित शर्मा यांना उचलून ताहिर हुसेन आणि त्याचे समर्थक त्याच्या घरी घेऊन गेले होते असा आरोप अंकितच्या भावाने केला आहे. दरम्यान, दिल्ली हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर दिल्लीच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पालिकेच्या शाळेत १४ विद्यार्थिनींचा संगणक प्रशिक्षकाकडून विनयभंग