पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंकित शर्मा हत्या प्रकरणः ताहिर हुसनेला ७ दिवसांची पोलिस कोठडी

ताहिर हुसेन  Photo by Sanjeev Verma

दिल्ली हिंसाचारात आयबी अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणातील आरोपी आम आदमी पक्षाचा माजी नगरसेवक ताहिर हुसेनला कडकड्डूमा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ताहिर हुसनेला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी न्यायालयाच्या पार्किंगमधून अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी ताहिर हुसनेला आज न्यायालयात सादर केले होते. तिथे न्यायालयाने त्याला ७ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले. 

अटकेपूर्वी ताहिर हुसेनने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळत आपल्याला फसवले जात असल्याचे म्हटले होते. दंगेखोरांनी माझ्या घराचा गैरवापर केला. मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीस तयार आहे. भाजपने मला कट रचून फसवले आहे. मी दंगेखोरांना माझ्या घरातून पळवण्याचा प्रयत्न केला होता. नार्को टेस्टलाही मी तयार आहे. पोलिसांनी मला माझ्या स्वतःच्या घरातून वाचवले होते. 

निर्भया प्रकरणः दोषी मुकेशची पुन्हा एकदा न्यायालयात धाव

दिल्ली हिंसाचारानंतर ताहिरच्या शोधासाठी एसआयटीने दिल्ली, एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील १४ ठिकाणी त्याचा शोध घेतला होता. एसआयटीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताहिरने २ मोबाइल नंबरचा वापर केला. २४ तारखेला १२ वाजेपर्यंतचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले. त्यानुसार ताहिरने २४ च्या रात्री १२ च्या सुमारास चांद बागच्या त्याच घरी उपस्थित होता. त्याचबरोबर ताहिरने २४ तारखेला दिवसभर सुमारे १५० कॉल्स केले होते. ताहिरने हे कॉल कोणाला केले होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IB officer Ankit Sharma murder case: Delhi Karkardooma Court sends suspended AAP Councilor Tahir Hussain to 7 day police custody