पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरचे माजी IAS अधिकारी शाह फैजल पोलिसांच्या ताब्यात

माजी आयएएस अधिकार शाह फैसल

माजी आयएएस अधिकार शाह फैजल यांना बुधवारी दिल्ली विमानतळावरूनच पुन्हा काश्मीरच्या दिशेने परतावे लागले. सुरक्षिततेच्या अधिनियमानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजल इस्तंबूलला जाण्यासाठी काश्मीरहून दिल्लीच्या विमानतळावर दाखल झाल्यानंतर दिल्लीच्या विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

मोदी-शहांचे कौतुक करणाऱ्या रजनीकांत यांच्यावर ओवेसींची टीका

दिल्लीच्या विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर त्यांना जम्मू काश्मीरला परत जाण्याचे सांगण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिल्यानंतर फैजल यांनी जम्मू काश्मीरमध्ये पीपल्स मुव्हमेंट हा नवा पक्ष स्थापन केला होता.  

उल्लेखनिय आहे की, जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यानंतर फैजल यांनी राज्यातील नागरिकांना अप्रत्यक्षरित्या बंदी करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली होती. जवळपास ८० लाख लोकांना बंदी करण्यात आले असून यापूर्वी अशी परिस्थिती पाहिली नव्हती, असे ते म्हणाले होते. 

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाविरोधात काश्मीर खोऱ्यातील अनेक नेत्यांनी आवाड उठवला होता. फैसल हे त्यापैकीच एक नेते आहेत.