पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोण आहेत कोरोनाचे अपडेट देणारे IAS अधिकारी लव अग्रवाल, वाचा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल

देशात कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. अशावेळी मोदी सरकारच्या एका आयएएस अधिकाऱ्याच्या पत्रकार परिषदेची दररोज वाट पाहिली जाते. हे अधिकारी आहेत आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल. सध्या दररोज दुपारी चार वाजता सर्व वृत्त वाहिन्यांवर पत्रकार परिषदेत मध्यवर्ती ठिकाणी बसून संपूर्ण देशाला कोरोना विषाणूबाबतची ताजी माहिती ते देत असतात. 

आम्ही कोरोना विषाणूपासून पूर्णपणे मुक्त, उत्तर कोरियाचा दावा

देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या किती झाली आहे, किती जणांचा मृत्यू झाला आहे आणि सरकार काय करत आहे, नागरिकांना काय करायला हवे याबाबतची सर्व माहिती लव अग्रवाल माध्यमांना दररोज देत असतात. आंध्र प्रदेशमध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम केल्यानंतर आता आरोग्य मंत्रालयात महत्त्वाची भूमिका निभावत असलेले लव अग्रवाल यांची ओळख ही नवनवीन कल्पना राबवणारे आयएएस अधिकारी अशी आहे. त्यांच्याबरोबर काम केलेले अधिकारी सांगतात की, तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य यंत्रणात सुधारणा करण्यासाठी लव अग्रवाल हे नेहमी अग्रेसर असतात. 

कोविड आणि कोरोना, दाम्पत्यांनी केलं जुळ्यांचं नामकरण

मुळचे उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील रहिवासी असलेले लव अग्रवाल आंध्र प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीतून १९९३ साली मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेले आहे. त्यानंतर ते १९९६ मध्ये आयएएस उत्तीर्ण झाले. त्यांना आंध्र प्रदेश केडर मिळाले. त्यांनी तिथे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम केले. ते आंध्र प्रदेशचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्तही होते. 

व्हॉट्सअपवर कोरोनाबाधिताचे नाव टाकले, ग्रूप अ‍ॅडमीनविरोधात गुन्हा दाखल

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध योजनांमुळे ते चर्चेत होते. २०१६ नंतर लव अग्रवाल यांनी केंद्रात प्रतिनियुक्ती मागितली. मोदी सरकारने त्यांना २८ ऑगस्ट २०१६ मध्ये आरोग्य मंत्रालयात संयुक्त सचिवपदी नियुक्त केले. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. म्हणजे २०२१ पर्यंत ते या पदावर राहतील. 

४६ वर्षीय लव अग्रवाल यांच्याकडे आरोग्य मंत्रालयातील जागतिक आरोग्य, मानसिक आरोग्य, तंत्रज्ञान, सार्वजनिक धोरणाची जबाबदारी आहे. जागतिक मंचावर भारताची बाजू मांडण्याची त्यांना संधी मिळाली आहे. याचवर्षी जानेवारीमध्ये जी-२० देशांच्या एका संमेलनात मोदी सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचे सादरीकरण त्यांनी केली होती.

लॉकडाऊनः एका आठवड्यात वाढल्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी