पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या बळींचा आकडा २००० पार, IAF च्या विमानाचे उड्डाण उशिराने

कोरोना विषाणू

चीनमधील वुहानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानास तेथून उड्डाण करण्यास उशीर झाला. वुहानमध्ये बुधवारी पहाटेपर्यंत आणखी ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २११८ झाला आहे. या पार्श्वभूमीवर या विमानास तेथून उड्डाण करण्यास उशीर झाला.

कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या सेटवर अपघात, ३ मृत्युमुखी

चीनमध्ये या आजाराचा सामना करीत असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून वैद्यकीय मदत चीनला देण्यात आली. हीच वैद्यकीय मदत घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान वुहानमध्ये दाखल झाले. हे विमान परतताना त्यातून वुहानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यात येणार होते. तांत्रिक कारणांमुळे हे विमान तेथून उड्डाण करण्यास उशीर होणार असल्याचे कळविण्यात आले.

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात वुहानमध्ये कोरोनाची नव्याने लागण झालेल्यांचा आकडा झपाट्याने खाली आला. गुरुवारी वुहानमध्ये ३९४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ७४५७६ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. १२०९ रुग्ण या आजारातून बरे होत असल्याचेही दिसून आले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना यापुढे सरकारकडून मोफत चष्मे

चीनमधून आणखी ९० भारतीयांना मायदेशी परत आणण्यात येणार आहे. त्यासाठीच भारतीय हवाई दलाचे विमान तिथे पाठविण्यात आले होते. चीनमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशांपर्यंत विमान उशिराने उड्डाण करणार असल्याचा संदेश पोहोचविला आहे.