पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहिले राफेल विमान याच महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

राफेल लढाऊ विमान

गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले राफेल लढाऊ विमान अखेर येत्या १९ सप्टेंबरला भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. फ्रान्सकडून औपचारिकपणे पहिले राफेल लढाऊ विमान भारताकडे सोपविले जाणार आहे. या घटनेशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली.

उरण येथील ONGC प्लॅंटमध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू

राफेल विमान औपचारिकपणे भारतीय हवाई दलात दाखल होताना होणाऱ्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. ते त्यासाठी फ्रान्सला जाणार आहेत, अशी माहिती मिळते आहे. त्याचबरोबर हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनुआ हे सुद्धा या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पहिल्या राफेल विमानाचा हस्तांतर कार्यक्रम व्हावा, असे केंद्र सरकारने फ्रान्सला कळविले होते. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातील वृत्त २४ जुलै प्रकाशित केले होते. एकूण ३६ राफेल विमाने फ्रान्सकडून भारताला मिळणार आहेत.

१९ सप्टेंबरला जरी औपचारिकपणे पहिले राफेल विमान भारतीय हवाई दलात दाखल होणार असले, तरी पहिल्या टप्यातील चार राफेल विमाने पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये भारतात येणार आहेत. सप्टेंबर २०२२ पर्यंत सर्व ३६ विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येणार आहेत. 

८ अपाचे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात, सुरक्षा अधिक मजबूत

२३ सप्टेंबर २०१६ फ्रान्सशी केलेल्या करारानुसार ५९ हजार कोटी रुपयांना भारताने ३६ राफेल विमानांची खरेदी केली होती. याच विमानांच्या खरेदी करारावरून लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.