पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय हवाई दलाला हवेत अतिरिक्त ४० हजार कोटी

एअर चीफ मार्शल बी एस धनोआ

नवी उपकरणे घेण्यासाठी आणि करार केलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रे आणि इतर व्यवस्थांचे पैसे अदा करण्यासाठी भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारकडे अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून विविध बदल केले जात आहेत. त्याअंतर्गत कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

शिवाजी महाराजांचे विचार भाजपच पुढे नेत आहे, उदयनराजेंचा भाजपत प्रवेश

चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये भारतीय हवाई दलासाठी ३९,३०० कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. पण एवढ्या निधीवर आधुनिकीकरण करणे अशक्य असल्याचे दिसते आहे. त्यासाठीच हवाई दलाने अतिरिक्त निधीची मागणी केली. निधीअभावी कामे आणि करार रखडू नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. हवाई दलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटींवर ही माहिती दिली.

अधिकारी म्हणाले, आमच्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी आणि आधुनिकीकरणासाठी लागणारा निधी यामध्ये तफावत आहे. त्यामुळेच आम्ही सरकारकडे अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. हवाई दलाने केलेल्या मागणीचा डिसेंबरमध्ये सुधारित आर्थिक तरतुदीत नक्की विचार केला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

भास्कर जाधव यांच्या शिवसेनाप्रवेशापूर्वी घडला हा भन्नाट किस्सा!

भारतीय हवाई दलाला अनेक नवी लढाऊ विमाने घ्यायची आहेत. यामध्ये ११४ नवी मध्यम आकाराची लढाऊ विमाने, ३३ नवी मिग २९एस आणि सुखोई ३०एस विमाने, ५६ नवी मध्यम आकाराची वाहतुकीसाठीची विमाने, ७० प्राथमिक प्रशिक्षण विमाने यांचा समावेश आहे.

नवी खरेदी करण्याबरोबरच ज्या खरेदीचे करार करण्यात आले आहेत आणि ती सामग्री हवाई दलात दाखल होत आहे. त्याचेही पैसे आम्हाला द्यायचे आहेत. त्यासाठीही अतिरिक्त निधीची गरज आहे. हा आकडा ४८ हजार कोटी रुपये इतका आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.