पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वायुसेनेच्या विमानातून चीनमधल्या ७६ भारतीयांना आणले माघारी

७६ भारतीयांना आणले माघारी

चीनमधील वुहानमध्ये अडकलेल्या ७६ भारतीय आणि ७ देशांच्या ३६ नागरिकांना वायुसेनेच्या विमानातून  दिल्लीत आणण्यात आले. वुहान हे कोरोनाचं केंद्रबिंदू आहे. चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या दोन विशेष विमानानं भारतीयांना चीनमधून परत आणण्यात आलं  होतं. 

कोरोना : जपानच्या जहाजात अडकलेले ११९ भारतीय २० दिवसांनी मायदेशी परतले

गुरुवारी पहाटे वायुसेनेच्या विशेष विमानातून ११२ जणांना चीनमधून भारतात आणण्यात आलं. भारतीयांबरोबर यात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, मादागास्कर, म्यानमार, मालदीव आणि चीनमधल्या लोकांचाही समावेश आहे. ३६ परदेशी नागरीकांपैकी  सर्वाधिक म्हणजे २३ हे बांगलादेशी विद्यार्थी आहेत.

मराठी भाषा दिन विशेष : मराठी शिक्षणाचे भविष्यचित्र

हे विमान आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशीरा आलं, प्रवाशांची भारतात येण्यापूर्वी पुन्हा एकदा आरोग्य चाचणी करण्यात आली त्यामुळे हे विमान भारतात परतण्यासाठी उशीर झाला.  भारतात आणलेल्या सर्व नागरिकांना १४ दिवस विशेष निगराणीखाली ठेवण्यात  येणार आहे.