पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहिले राफेल विमान सप्टेंबरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यात

राफेल लढाऊ विमान

गेल्या काही महिन्यांपासून ज्याची देशाच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा झाली, ते राफेल लढाऊ विमान येत्या २० सप्टेंबरला औपचारिकपणे भारतीय हवाई दलात दाखल होण्याची शक्यता आहे. एकूण ३६ राफेल विमानांपैकी पहिली दोन विमाने भारतीय हवाई दलामध्ये दाखल होणार आहेत, असे हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटींवर सांगितले.

कर्नाटकात भाजपच्या गोटात वेगवान हालचाली, सत्तेचा दावा करण्याची तयारी

भारतीय हवाई दलामध्ये राफेल विमाने दाखल होण्याचा औपचारिक सोहळा सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व्हावा, असे पत्र हवाई दलाकडून फ्रान्स सरकारला पाठविण्यात आले आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, सप्टेंबरमध्ये १८ ते २३ या तारखांदरम्यान एखाद्या दिवशी राफेल विमाने भारतीय हवाई दलात दाखल होण्याचा कार्यक्रम व्हावा, असे आम्ही फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाला कळवले आहे. 

सप्टेंबरमध्ये राफेल विमानांचा पहिला ताफा भारतीय हवाई दलात दाखल होणार असला, तरी ही विमाने भारतातील हवाई दलाच्या तळांवर दाखल होण्यास पुढच्या वर्षीचा एप्रिल-मे महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सर्वच्या सर्व ३६ राफेल विमान भारताला मिळण्यासाठी सप्टेंबर २०२२ पर्यंत थांबावे लागणार आहे. राफेल विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाल्यानंतर आपल्या हवाई दलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साठले

२३ सप्टेंबर २०१६ रोजी भारताने फ्रान्सशी राफेल संदर्भात करार केला होता. ५९ हजार कोटी रुपयांना भारताने ३६ राफेल विमानांची ऑर्डर फ्रान्सकडे नोंदविली होती. याच करारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता.