पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरुणाचल प्रदेशः चीन सीमेवर भारताने वाढवली ताकद

अरुणाचल प्रदेशः चीन सीमेवर भारताने वाढवली ताकद

चीनबरोबरील तणावपूर्ण संबंधादरम्यान भारताने अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक अडव्हान्स लँडिंग ग्राऊंड सुरु केले आहे. चीन आणि म्यानमारच्या सीमेनजीक विजयनगर येथे अडव्हान्स लँडिंग ग्राऊंडचा शुभारंभ करण्यात आला. पूर्व विभागाचे एअर कमांडर एअर मार्शल आर डी माथूर आणि भारतीय लष्कराचे पूर्व क्षेत्राचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट एन-३२ लँड करुन याची सुरुवात केली. 

VIDEO: पाक सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला

अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करी पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या उद्देशाने ८ अडव्हान्स लँडिंग ग्राऊंड बनवण्यात आले आहे. त्यातीलच विजयनगर अडव्हान्स लँडिंग ग्राऊंड आहे. दोन इंजिन असणाऱ्या एन-३२ विमानाने सुमारे ३ वर्षांनंतर विजयनगर हवाई पट्टीवर उतरले. विजयनगर भारतात असले तरी त्याचा संपर्क नव्हता. अत्यंत दुर्गम असलेल्या या भागात रस्ते नसल्यामुळे तिथे पोहोचणे शक्यच नव्हते.

८ अडव्हान्स लँडिंग ग्राऊंड केले विकसित 

डोकाला पास जवळ एक रस्ता बनवला जात होता. त्याला भारतीय लष्कराने विरोध करत हे काम थांबवले होते. त्यानंतर केंद्र सरकारने संरक्षणाचे उद्धिष्ठ पूर्ण करण्यासाठी हवाई मार्ग विकसित करण्याची प्रक्रिया पुढे नेली. राज्यात ८ ८ अडव्हान्स लँडिंग ग्राऊंडची दुरुस्ती कर ते आधुनिक केले जात आहे. ज्यावर सुमारे १ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

तत्पूर्वी, भारताने पासीघाट अडव्हान्सड लँडिंग ग्राऊंड सुरु केले होते. विजयनगर अडव्हान्सड लँडिंग ग्राऊंड अरुणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्याजवळ आहे. भारताच्या उलट चीनने आपल्या सीमेपर्यंत चारचाकी वाहन घेऊन जाण्याइतपत रस्ते बनवले आहेत. इतकेच नव्हे तर चीनने डोकलाम वादानंतर आपल्या सैन्यांची संख्याही इथे वाढवली आहे.

हिंदी भाषा लादणं चुकीचं : रजनीकांत

अडव्हान्सड लँडिंग ग्राऊंडचा हा होईल फायदा

अडव्हान्सड लँडिंग ग्राऊंडमुळे भारत आता आपले सैनिक, शस्त्रास्त्रे आणि लष्करी साहित्य सहजपणे चीनच्या सीमेपर्यंत पोहचवू शकेल. या धावपट्टीवर भारताचे लढाऊ विमान सुखोई ३० एमकेआय हे लँड करु शकतील. विजयनगरच्या तिन्ही बाजूला म्यानमार आहे. तेथून जवळचा रस्ता हा १८० किमी दूर आहे. स्थानिक लोकांना तिथे पोहोचण्यासाठी ४ दिवस लागतात. येथे आवश्यक सर्व सामना, पेट्रोल, डिझेल आदि हेलिकॉप्टरने आणले जाते. ही धावपट्टी तयार करण्यासाठी ११ गावातील लोकांनी श्रमदान केले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IAF AN 32 transport aircraft landed at Vijaynagar advanced landing ground in Arunachal Pradesh near the China border