पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माफी मागणार नाही, राहुल गांधी आपल्या कमेंटवर ठाम

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया कमेंटवरून शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपच्या महिला खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या माफीची मागणी केली. पण आपण माफी मागणार नसल्याचे राहुल गांधी यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' कमेंटवरून संसदेत गदारोळ, भाजप आक्रमक

राहुल गांधी म्हणाले, आधी केलेल्या एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली रेप कॅपिटल म्हणत असल्याची क्लीप माझ्याकडे आहे. मी ती क्लीप ट्विट करणार आहे म्हणजे सगळ्यांनाच ती दिसेल. नागरिकत्व कायद्यातील बदलानंतर पूर्ण ईशान्य भारत जळतो आहे. तेथून लक्ष हटविण्यासाठीच भाजपने माझ्या कमेंटवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी झारखंडमधील गोड्डामध्ये जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणाले होते 'मेक इन इंडिया'. पण देशात सध्या कुठेही बघितले की 'रेप इन इंडिया' असेच दिसते आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या एका आमदाराने महिलेवर बलात्कार केला. नंतर त्या महिलेच्या गाडीला अपघात झाला. पण नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही. 

कलम ३७०, नागरिकत्व दुरुस्तीनंतर आता भाजपचा या दोन कायद्यांवर फोकस

नरेंद्र मोदी म्हणतात बेटी बचाओ, बेटी पढाओ पण नक्की कोणापासून बेटी बचाओ हे ते सांगत नाहीत. भाजपच्याच आमदारांपासून मुली वाचविल्या पाहिजेत, असेही राहुल गांधी या सभेत म्हणाले होते.