पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साध्वी प्रज्ञांनी लोकसभेत मागितली माफी

साध्वी प्रज्ञासिंह

महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त संबोधल्याबद्दल खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभेत माफी मागितली आहे. पक्ष आणि सरकारने समज दिल्यानंतर प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली आहे. माझ्या पूर्वीच्या एखाद्या वक्तव्याने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी माफी मागते, असे त्यांनी सभागृहात म्हटले. त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, एका सन्मानित नेत्याने मला दहशतवादी म्हटले. माझ्याविरोधात कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. पण अशा पद्धतीने बोलणे म्हणजे एका महिलेचा अपमान आहे.

गोव्यातही राजकीय भूकंप- संजय राऊत

साध्वी प्रज्ञा यांनी एका बाजून माफी मागितली पण दुसऱ्या बाजूने त्यांनी आपले वक्तव्य तोडून-मोडून सादर केल्याचा आरोप केला. मी महात्मा गांधींचे विचार आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा मी सम्मान करते. प्रज्ञा यांच्या माफीनाम्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला. 

त्या पुढे म्हणाल्या की, आरोप सिद्ध झालेले नसतानाही कोणाला दहशतवादी म्हणणे बेकायदा आहे. मला आधीच्या यूपीए सरकारवरनेही विनाकारण त्रास आणि मानसिक छळही केला. 

'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्या'

काँग्रेस खासदारांच्या गोंधळावर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी साध्यी प्रज्ञा यांनी माफी मागितली असून यावर आता राजकारण करु नका, अशी विनंती केली.