पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममतांदीदींनी PM मोदींना सांगितली 'मन की बात', पण...

ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी

पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शनिवारी कोलकातामध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी काही काळ एकमेकांसोबत चर्चा देखील केली. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या वादग्रस्त निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी मोदींशी चर्चा केली.

PM मोदी- CM ममता यांच्या भेटीची चर्चा!

मोदींसोबतच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या मुद्याला आमचा विरोध आहे. सरकारने हे निर्णय रद्द करावेत, अशी मागणी मोदींकडे केल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मी या ठिकाणी वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहे. तुम्हाला या मुद्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला यावे लागले, असे मोदींनी म्हटल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. देशातील वादग्रस्त ठरत असलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मोदींनी दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.  राजभवनामध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडल्याचेही पाहायला मिळाले. यावर देखील ममता बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला अन्य कार्यक्रमासाठी देखील बोलवण्यात आले होते. मात्र घटनात्मक मान राखण्यासाठी मी केवळ मिलेनियम पार्कमधील कार्यक्रमात सहभागी झाले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

धार्मिक आधारावर देशात फूट पाडणे हाच CAA चा उद्देश : सोनिया गांधी

ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिलेनियम पार्कमधील हावडा ब्रिज नावाने प्रसिद्ध असलेल्या रविद्र सेतुच्या लाइट अँण्ड साउंड शोचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.  नेताजी सुभाषचंद्र बोस, रास बिहारी बोस, खुदीराम बोस, देशबंधू बाघा जतीन, बिनॉय दिनेश या महान स्वतंत्र सेनानींच्या स्मरनार्थ 'बिल्पोबी भारत' नावाने म्युझियमची उभारणी करण्यात येईल, असे मोदी यावेळी म्हणाले.  देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाची पाच म्युझियम उभारण्याचा मानस असून याची सुरुवात ही कोलकातामधील म्युझियमने केली जात असल्याचे ते म्हणाले. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: I met PM and said him that we are against CAA and NPR Says West Bengal CM Mamata Banerjee