पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Chandrayan-2: जेव्हा नासाने मानली हार तेव्हा चेन्नईच्या 'या' इंजिनिअरने शोधला 'विक्रम'

षण्मुगा सुब्रमण्यम (Facebook/Shanmuga Subramanian)

अमेरिकन अंतराळ संस्थेने (नासा) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची छायाचित्रे जारी केली होती. चेन्नईच्या षण्मुगा सुब्रमण्यमने या छायाचित्रांवर भरपूर मेहनत घेतली आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरच्या अवशेषांचा शोध लावला. षण्मुगाने नासाला याची माहिती दिली आणि त्यांनीही काही वेळातच याला पुष्टीही दिली. नासाने षण्मुगाचे आभार मानत त्याचे कौतुकही केले आहे.  

आरे प्रकरणः मेट्रोसाठी वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

षण्मुगा सुब्रमण्यम उर्फ शान मॅकेनिकल इंजिनिअर आणि कॉम्प्यूटर प्रोग्रामर आहे. सध्या तो चेन्नईतील लेनॉक्स इंडिया टेक्नालॉजी सेंटरमध्ये टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहे. ७ सप्टेंबर २०१९ ला विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या हार्ड लँडिंगचा हा पैलू शोधून शानने मोठे योगदान दिले आहे. 

धक्कादायक, पुण्यात सिंहगड रस्त्यावर आढळला तरुणीचा मृतदेह

शान मदुराईत राहणारा असून त्याने यापूर्वी कॉग्निजंटसारख्या कंपन्यांमध्येही काम केले आहे. विक्रम लँडरच्या अवशेषांची माहिती घेण्यासाठी शानने नासाच्या लूनर रेकॉन्सेन्स ऑर्बिटरद्वारे (एलआरओ) घेण्यात आलेल्या छायाचित्रांवर काम केले. हे छायाचित्र १७ सप्टेंबर, १२, १५ ऑक्टोबर आणि ११ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले होते.

जीडीपी म्हणजे रामायण, बायबल नाहीः भाजप खासदार

शानने आपल्या या शोधाची माहिती नासाला दिली. नासाने काही वेळ घेत शानच्या शोधाला दुजोरा दिला. त्याच्या शोधाला दुजोरा देताना नासाचे एलआरओ मिशनचे जॉन केलर यांनी लिहिले की, विक्रम लँडरच्या अवशेषांचा शोधासंबंधीच्या इ-मेलसाठी तुमचे आभार. एलओसी टीमने याची खातरजमा केली आहे. सांगण्यात आलेल्या लोकेशनवर लँडिंगच्या पूर्वीचे आणि नंतरच्या स्थितीत बदल दिसत आहे. नासा आणि एएसयूने याबाबत घोषणा करताना त्याला क्रेडिटही दिले.

नासाने चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरला शोधले, छायाचित्र केले जारी

शानचे अभिनंदन करताना जॉन केलर पुढे म्हणाले की, तुम्ही भरपूर मेहनत आणि वेळ व्यतीत करुन जे काम केले, त्यासाठी शुभेच्छा. आम्ही जास्त वेळ घेतल्यामुळे तुमची माफी मागू इच्छितो. कारण याची घोषणा करण्यासाठी आम्हाला संपूर्णपणे संतुष्ट व्हायचे होते.