पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करत नाही : PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्र सरकार आंध्र जनतेच्या मदतीसाठी सदैव तयार आहे, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशातील जनतेला दिले. श्रीलंका दौरा आटोपून पंतप्रधान मोदींनी रविवारी आंध्र प्रदेशचा धावता दौरा केला. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. आम्ही फक्त सत्ता स्थापनेसाठी निवडणूक लढवत नाही तर सेवाभावीवृत्तीने देश घडवण्याचे कार्यावर विश्वास ठेवतो.

त्यामुळे जनहितासाठी नेहमीच कार्यरत राहू. आम्हाला सरकार स्थापनेसोबतच देशही घडवायचा आहे. सरकारचा उपयोगही देश घडवण्यासाठीच झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करणे आमचा स्वभाव नाही व विचारही नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर निशाणाही साधला. आंध्र प्रदेशमध्ये उतरल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. एवढेच नाही तर त्यांनी मोदींचे पाय धरुन आशीर्वाद घेतल्याचेही पाहायला मिळाले.

यावेळी मोदींनी जगनमोहन रेड्डी यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला. जगनमोहन यांच्यामध्ये राज्याचा विकास करण्याची धमक आहे, असे सांगत त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:i faith 130 crore people of india for make better india says pm narendra modi in tirupati