पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हा क्रांतीकारक नव्हे तर राजकीय निर्णयः सोली सोराबजी

भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या प्रस्तावाचे देशभर स्वागत होताना दिसत आहे. तसेच काहीजण या निर्णयाचा विरोध करतानाही दिसत आहे. भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. हा क्रांतीकारक निर्णय आहे, असे मला वाटत नाही. हा संपूर्णपणे राजकीय निर्णय आहे, आणि शहाणपणाचा तर निश्चितच नाही, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला. 

कलम 370: केंद्राकडून लष्कर आणि वायूदलाला हाय अलर्ट जारी

सोली सोराबजी हे एएनआयशी बोलत होते. त्यांनी हा राजकीय निर्णय असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. मोदी सरकारानं काश्मिरी नेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता मात्र नेत्यांना विश्वासात घेतलं नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. 

काश्मिरच्या नेत्यांना विश्वासात घेण्यास सरकार अपयशी- शरद पवार

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ७२ वर्षांनंतर देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. पण देशाचे आज स्वातंत्र्य पूर्ण झाले आहे. देशाच्या सार्वभौमत्वाशी कुठेही तडजोड होणार नाही याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. या निर्णयामुळे देशात अजूनही पोलादीपणा कायम आहे, हे दिसून आले आहे. शिवसेना-भाजपचे महत्वाचे वचन आज पूर्ण झाले आहे. बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असेही ते म्हणाले.

ऐतिहासिक!, कलम ३७० हटवण्याची शिफारस, काश्मीर केंद्रशासित प्रदेश

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:I dont think there is anything revolutionary here Former Attorney General Soli Sorabjee on to revoke Article 370