पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीदी, तुमची थप्पड माझ्यासाठी आशीर्वाद - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

सध्या देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाकयुद्ध सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. मला असे सांगण्यात आले की मला थप्पड मारायची असल्याचे दीदींनी म्हटले आहे. ममता दीदी, मी तुम्हाला दीदी म्हणतो आणि पुढेही दीदी म्हणतच राहिन. तुमची थप्पड माझ्यासाठी आशीर्वादच आहे, असे मोदींनी पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील एका प्रचारसभेत म्हटले आहे.

नुसतेच जय श्रीराम म्हणता, एकतरी राम मंदिर बांधले का?, ममतांचा मोदींना सवाल

ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, चिटफंड घोटाळ्यात गरिबांचे पैसे लाटणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना ममता बॅनर्जी यांनी थप्पड मारली असती, तर आज त्यांना हारण्याची भीती वाटली नसती. जर पूर्वीच तुम्ही खंडणी उकळणाऱ्यांना थप्पड मारली असती, तर तुमच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर काळ डाग लागला नसता. नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या दोन टर्ममधील सत्तेचेही यावेळी वाभाडे काढले. 

ममताजींनी पातळी ओलांडली, सुषमा स्वराज यांचे ट्विट

पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी १७ ठिकाणी मतदानाच्या शेवटच्या दोन टप्प्यांत म्हणजेच १२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपने यावेळी पश्चिम बंगालवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. काही महिन्यांपूर्वी तिथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली होती. पक्ष या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. गेल्या दशकभरात या राज्यात भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढच होत गेली आहे.