पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वृत्तवाहिन्यांवर नियंत्रणासाठी कायदा करण्याचा विचार - कुमारस्वामी

एच डी कुमारस्वामी

माध्यमांकडून विशेषतः वृत्तवाहिन्यांकडून बेजबाबदार वार्तांकन केले जात असल्याचा आरोप करीत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी वृत्तवाहिन्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नवा कायदा करण्याचा सरकार विचार करीत असल्याचे म्हटले आहे. रविवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

कुमारस्वामी म्हणाले, तुम्ही आम्हा राजकारण्यांना नक्की समजता काय?, तुम्हाला असे वाटते का की आम्ही बेरोजगार आहोत?, आम्ही कार्टूनमधील व्यक्तिरेखांप्रमाणे दिसतो का? सगळं काही चेष्टा-मस्करीत मांडण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी उपस्थित केले आहेत. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे.

Lok Sabha election 2019 Exit Poll: बहुतांश एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा 'नमो-नमो'

टाइम्स ऑफ इंडियातील वृत्तानुसार, जर वृत्तवाहिन्यांच्या प्रमुखांकडे दाखविण्यासाठी चांगले काही नसेल, तर तुमची वाहिनी बंद करा आणि घरी जा. उगाच चुकीच्या माहितीवर आणि स्वतःच्या धारणांवर आधारित बातम्या कशाला दाखवता, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांकडून पूर्वी काही निती-नियम पाळले जायचे. पण आता ते सगळे बंद झाले आहे. केवळ माझ्यासाठी उपयुक्त वार्तांकन केल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेला नाही. राज्यातील साडेसहा कोटी लोकांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळेच मी इथपर्यंत आलो असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले.