पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मला अटकेची भीती वाटत नाही, पण त्यामुळे अजून प्रश्न निर्माण होतील'

कमल हासन

मक्कल नीधी मयम (MNM) पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी दहशतवादाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांच्याविरोधात तामिळनाडूमध्ये आंदोलन सुरू झाले आहे. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे असे वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. याच मुद्द्यावरून कमल हासन यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले असून, त्यांना अटक करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. मला अटकेची भीती वाटत नाही. त्यांना अटक करायची असेल, तर करू दे. पण त्यातून फक्त नवीन प्रश्न निर्माण होतील. ही धमकी नाही तर केवळ सल्ला आहे, असे कमल हासन यांनी म्हटले आहे. एएनआयने हे ट्विट केले आहे.

माझे वक्तव्य हिंदूविरोधी असल्याचे पसरवले जात आहे - कमल हासन

कमल हासन यांच्या रॅलीवर त्रिचीमध्ये दगडफेक करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, राजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे. पण मला यामुळे धमकावल्यासारखे मुळीच वाटत नाही. प्रत्येक धर्मामध्ये अतिरेकी विचार करणारे आहेतच. इतिहासातूनही आपल्याला हेच बघायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

या आधीही कमल हासन यांनी मी केवळ धार्मिक असहिष्णूतेबद्दल बोलत होतो, असे म्हटले होते. सर्व धर्मातील लोकांना एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहता आले पाहिजे. कट्टरतावाद मग तो कोणत्याही स्वरुपातील असू दे त्याचा निषेधच केला पाहिजे. पण माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. माझे बोलणे हिंदूविरोधी असल्याचे पसरवले जात आहे. दूष्ट हेतूनेच काही जणांकडून असे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.