पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी भाजपचा माणूस नाही, जाळ्यात अडकणार नाही - रजनीकांत

रजनीकांत

'काही लोक आणि माध्यमं मी भारतीय जनता पक्षाचा माणूस असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यात तथ्य नाही', असं रजनीकांत म्हणाले आहेत. एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावल्यानंतर  माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीकाही केली आहे. तसेच आपण भाजप पक्षातही जाणार नसल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी रजनिकांत भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. 

नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...

'भारतीय जनता पक्ष मला भाजपच्या भगव्या रंगात रंगवू पाहत आहे. त्यांनी हाच प्रयत्न तामिळ कवी  तिरुवल्लुवरसोबतही करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी किंवा ते देखील भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही', असं रजनीकांत एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले. 

राम मंदिर निकाल : सरन्यायाधीशांनी उ. प्रदेशातील अधिकाऱ्यांना बोलावले

'एखाद्या पक्षात कोणी सहभागी होत असेल तर  त्या पक्षासाठी ती आनंदाचीच बाब आहे, मात्र भाजपत जायचं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे', असं रजनिकांत यांनी स्पष्ट केलं आहे. 

राम मंदिर निकाल : सरन्यायाधीशांनी उ. प्रदेशातील अधिकाऱ्यांना बोलावले

तर दुसरीकडे आयोध्या निकाल प्रकरणावर त्यांनी जनतेस शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.