पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉयफ्रेंडशी लग्न होऊन ९ दिवस झाले असतानाच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

बॉयफ्रेंडशी लग्न होऊन नऊ दिवस झालेले असतानाच हैदराबादमध्ये एका २५ वर्षांच्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली. संबंधित तरुणी सॉफ्टवेअर अभियंता आहे. दासरी पौर्णिमा असे तिचे नाव आहे. हैदराबादमध्येच एका बहुराष्ट्रीय कंपनीत ती काम करीत होती. मंगळवारी तिचा मृतदेह हैदराबादमधील रामरावनगर भागातील तिच्या राहत्या घरात आढळला. घरातील फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह दिसला होता.

भयंकर!, उ. प्रदेशात बलात्कार पीडितेला आरोपींकडून जाळण्याचा प्रयत्न

पौर्णिमाचा नवरा कार्तिकने सर्वात आधी तिचा मृतदेह बघितला आणि त्याने लगेचच पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पौर्णिमाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सनथनगर पोलिस ठाण्यात कार्तिक विरोधात तक्रार दाखल केली आहे. पौर्णिमाची हत्या करण्यात आली असून, यामध्ये कार्तिकचा हात असल्याचे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. 

सनथनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. चंद्रशेखऱ रेड्डी यांनी सांगितले की, पौर्णिमाच्या डोक्यावर आणि मानेवर जखमा आहेत. त्या नक्की कशाच्या आहेत, याचा शोध घेण्यात येतो आहे. आम्ही या प्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. आम्ही कार्तिकची चौकशीही करतो आहोत, असे त्यांनी सांगितले. 

पुण्यातील तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोघे जण ताब्यात

पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. ती नक्की पौर्णिमानेच लिहिली होती का, याचाही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पौर्णिमा आणि कार्तिक यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांनी २५ नोव्हेंबरलाच लग्न केले. त्यांच्या लग्नाला पौर्णिमाच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या मदतीने लग्न केले होते.