पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद बलात्कार : जिथे ते पाशवी कृत्य केले तिथेच सर्व मारले गेले...

घटनास्थळाचे छायाचित्र (एएनआय)

हैदराबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक पाशवी बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिसांनी या एन्काऊंटरला दुजोरा दिला आहे. सर्व आरोपींना शुक्रवारी सकाळी ज्या ठिकाणी त्यांनी पाशवी कृत्य केले, तिथे नेण्यात आले होते. त्यावेळी चारही आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही जण मारले गेले. जिथे त्यांनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. तिथेच त्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. उड्डाण पुलाच्या खालीच ही घटना घडली.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी न्यायालयात सर्व आरोपींची १० दिवस पोलिस कोठडी गेल्या सोमवारी मागितली होती. पण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे हे सर्व आरोपी सायबराबाद पोलिसांच्या ताब्यात होते. ही घटना घडल्यानंतर ३६ तासांच्या आत पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती. 

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट

बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती. पण चारही आरोपी त्याच ठिकाणी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याने काही नागरिकांनी आनंद व्यक्त केला. बलात्कार करणाऱ्यांवर कायद्याचा आणि पोलिसांचा जरब बसलाच पाहिजे, अशी अपेक्षा काही महिलांनी व्यक्त केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:hyderabad veterinary doctor rape and murder case all four accused killed under the same flyover where the doctor was burned alive