पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद बलात्कार प्रकरण: पोलिस उपनिरीक्षकांसह तिघांचे निलंबन

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरण

हैदराबादमधील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळल्याच्या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तीन पोलिसांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सायबराबादच्या पोलिस आयुक्तांनी एका पोलिस उपनिरीक्षकासह तिघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. डॉक्टर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार घेण्यास पोलिसांनी उशिर केला असल्याचा आरोप पिडीतेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री

सायबराबाद पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, '२७ आणि २८ नोव्हेंबर दरम्यानच्या रात्री एक महिला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात शमशाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास विलंब झाल्याचा आरोप पीडित महिलेचा कुटुंबियांनी केला होता. याची सखोल चौकशी केली. या प्रकरणी हलगर्जी झाल्याचं चौकशीतून निष्पन्न झाले. त्याआधारेच उपनिरीक्षक एम. रवी कुमार, हेड कॉन्स्टेबल पी. वेणुगोपाल रेड्डी आणि ए. सत्यनारायण गौड यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

पाच वर्षांत ११४ कंपन्या बंद, १६ हजार कर्मचाऱ्यांना फटका

दरम्यान, शनिवारी आरोपी ठेवलेल्या पोलिस ठाण्यावर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला. आरोपीला भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. तसंच आरोपीला आमच्या हवाली द्या, अशी मागणी करत काही जणांनी पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या जमावाला अडवले. यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला असता संतप्त जमावाने पोलिसांवर चप्पल फेकून मारल्या. 

विरोधी पक्षाच्या समजुतदारपणाचे कौतुक: जयंत पाटील