पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद बलात्कार प्रकरण : 'निर्भया'च्या आईची विनंती

आशा देवी

दिल्ली बलात्कार  प्रकरणानं संपूर्ण देश हादरला होता. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या जखमा अजूनही मनावर ताज्या आहेत. असं असताना हैदराबादमध्ये पशुवैद्यकिय महिला डॉक्टर बलात्कार करून तिला जाळून टाकणाऱ्या अमानवी कृत्यानं  देश सून्न झाला आहे. या प्रकरणात  आम्हाला न्याय मिळायला जशी दिरंगाई झाली तशी या मुलीच्या बाबतीत व्हायला नको अशी विनंती  दिल्ली बलात्कार  प्रकरणातील (निर्भया) पीडितेची आई आशा देवी यांनी केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर 'जैश'च्या दहशतवाद्यांचा दिल्लीवर होता निशाणा

हैदराबादमधील पशुवैद्यकिय महिला डॉक्टर बलात्कार करुन तिला जाळून टाकण्याचं कृत्य अत्यंत अमानवी आहे आणि हादरवून टाकणारं आहे. आम्हाला न्याय मिळवण्यासाठी ७ वर्षे झगडावं लागलं, मात्र तिला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. अशा घटना वारंवार का घडत आहेत हे खोलात जाऊन पाहायला पाहिजे अशी प्रतिक्रिया निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईनं एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. 

दापोडी:३० फूट खोल खड्ड्यात पडून जवानासह दोघांचा मृत्यू

या प्रकरणाच्या सुवनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश तेलंगणाचे मुख्यमंत्री  के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी दिले. तसेच या प्रकरणात तीन पोलिसांना निलंबीतही करण्यात आले. 

भाजप-काँग्रेसला धक्का, तृणमूलमध्ये ३०० हून अधिक कार्यकर्त्यांचा प्रवेश