पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद बलात्कार प्रकरण: जमावाने पोलिसांना चप्पल फेकून मारल्या

हैद्राबाद बलात्कार प्रकरण

हैदराबादमधील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरवर चार जणांनी बलात्कार करुन तिला जिवंत जाळल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरामध्ये उमटत आहे. ठिकठिणा या घटनेचा निषेध करत आंदोलन केली जात आहे. दरम्यान, हैदराबादमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतप्त जमावाने पोलिसांवर चप्पल फेकून मारल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी पटोले विरुध्द कथोरे लढत

आरोपी ठेवलेल्या पोलिस ठाण्यावर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला. आरोपीला भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. तसंच आरोपीला आमच्या हवाली द्या, अशी मागणी करत काही जणांनी पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या जमावाला अडवले. यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला असता संतप्त जमावाने पोलिसांवर चप्पल फेकून मारल्या. हैदराबादच्या शादनगर पोलीस स्टेशन बाहेर ही घटना घडली आहे.  

सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलन; दोन जवान शहीद

दरम्यान, या प्रकरणातील चारही आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चार आरोंपीपैकी तीन आरोपी हे २० वर्षांचे आहेत. तर एकाचं वय हे २६ आहेत. हे चारही आरोपी तेलंगणामधले आहेत. हैदराबाद पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. 

'२२ डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hyderabad rape case police lathicharged on locals who hurled slippers on police outside shadnagar police station