पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद मेट्रोचा मोठा निर्णय, महिला मिरची स्प्रे सोबत ठेवू शकणार

हैदराबाद मेट्रो

हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेले सामूहिक बलात्काराचे प्रकरण आणि महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तेथील मेट्रो रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे हैदराबादमधील मेट्रोमधून प्रवास करताना महिला स्वसंरक्षणासाठी त्यांच्यासोबत मिरची स्प्रे ठेवू शकतात, असे मेट्रो रेल्वेने म्हटले आहे.

धक्कादायक: भांडणातून चालत्या लोकलमधून प्रवाशाला फेकले

हैदराबाद मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक एनव्हीएस रेड्डी यांनी सांगितले की, या संदर्भात मेट्रो स्थानकावरील सुरक्षारक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. महिलांना मिरची स्प्रे सोबत ठेवून मेट्रो रेल्वेमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी बंगळुरूमध्ये अशाच पद्धतीने महिलांना स्वसंरक्षणासाठी मेट्रोमध्ये मिरची स्प्रे सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतरच हैदराबादमध्येही या स्वरुपाची मागणी पुढे आली होती. अखेर ती मान्य करण्यात आली.

'शबरीमला प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल म्हणजे अंतिम शब्द नाही'

मेट्रोमध्ये अग्नी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मिरची स्प्रेला बंदी आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो स्थानकांवर आणि मेट्रोमध्ये कडेकोट सुरक्षा ठेवली जाईल, असे याआधी सांगण्यात आले होते. पण हैदराबादमधील सामूहिक बलात्काराची घटना आणि महिलांवरील वाढते अत्याचार याचा विचार करून अखेर मिरची स्प्रे सोबत ठेवण्याला परवानगी देण्यात आली.