हैदराबाद एनकाऊंटरमध्ये मारले गेलेल्या आरोपींचे मृतदेह १३ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे निर्देश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १२ डिसेंबरपर्यंत टाळली आहे. त्यामुळे आरोपींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार नाही. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते.
कर्नाटक पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव, सिद्धरामय्यांचा राजीनामा
#TelanganaEncounter case: Telangana High Court orders to preserve the bodies of the accused (in rape and murder of woman veterinarian), till December 13. The matter has been posted for hearing on December 12.
— ANI (@ANI) December 9, 2019
उच्च न्यायालयाने हा आदेश मुख्य न्यायाधीशांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या एका अर्जावर दिला. यामध्ये या प्रकरणात न्यायिक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली होती. ही 'न्यायेतर हत्या' असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. तर तेलंगणा सरकारने ६ डिसेंबरला झालेल्या या एनकाऊंटरची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. आठ सदस्यीय एसआयटीच्या नेतृत्वाखाली राचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत हे करतील.
अमित शहा म्हणाले, ...म्हणून नागरिकत्व सुधारणा विधेयक