पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद एन्काऊंटर: माजी न्यायाधीशामार्फत चौकशी होण्याची शक्यता

हैदराबाद एन्काऊंटर

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत करण्याबाबत विचार करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. सरन्यायाधीश एस. ए बोबडे, एस. अब्दुल नजीर आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. याबद्दल आम्हाला जाणीव आहे. आम्हाला असे वाटते की, सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीत राहणाऱ्या एखाद्या माजी न्यायाधीशामार्फेत या प्रकरणाची चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले. 

भारतासाठी ऐतिहासिक दिवस; PM मोदींची प्रतिक्रिया

एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश नेमण्याचा आमचा प्रस्ताव आहे, असे पीठाने सांगितले. तसंच, पीठाने हे देखील स्पष्ट केले आहे की, या माजी न्यायाधीशाला दिल्लीत राहून काम करावे लागेल. हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर १२ डिसेंबर म्हणजे गुरुवारी विचार करण्यात येणार आहे. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात IPS अधिकाऱ्याचा राजीनामा

तेलंगणा सरकारच्यावतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि कृष्णकुमार सिंह यांनी सांगितले की, एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले आहे आणि हे प्रकरण राज्य सीआयडीकडे सोपविले आहे. दरम्यान, या एन्काऊंटर प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरुध्द स्वतंत्र तपास करण्यासाठी न्यायालयामध्ये दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली याचिका जी. एस मणि आणि प्रदीप कुमार यादव यांनी दाखल केली आहे. तर दुसरी याचिका मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केली आहे. 

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक १२५-१०५ अशा फरकाने मंजूर