पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुरुषांशी संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे महिलेला चौघींकडून मारहाण

प्रातिनिधिक छायाचित्र

पुरुष ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे चार महिलांनी हैदराबादमध्ये एका बार डान्सरला मारहाण केली. पोलिसांनी या चौघींनाही अटक केली आहे. हैदराबादमधील बेगमपेठ भागात हा प्रकार घडला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच पीडित महिलेने या बारमध्ये डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. पण ती कामावर आल्यानंतर बारचे व्यवस्थापन करणाऱ्या काही जणांकडून तिला ग्राहकांसोबत जाण्याची आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची बळजबरी केली जायची. 

सिद्धिविनायक मंदिर उडवू, प्रेमप्रकरणातून तरुणाची धमकी

वरील घटनेमध्ये पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास संबंधित बार डान्सरने नकार दिल्यावर चिडलेल्या चौघींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत असलेल्या एका पुरुषानेही पीडित महिलेले मारहाण केली. पोलिसांनी चारही महिलांना अटक केली आहे. पुरुष आरोपी फरार आहे. न्यायालयाने चारही महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सर्व आरोपींवर भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तेलंगणाचे पोलिस महासंचालक महेंदर रेड्डी यांनी या सर्व प्रकाराचा अहवाल पोलिस ठाण्याकडून मागविला आहे.