पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन: तीन बहिणींनी थेट PMO ला कॉल करत मांडली उपासमारीची व्यथा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूरण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. जागतिक संकटाचा धोका लक्षात घेत मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचा सामान्य आणि मोल मजूरी करणाऱ्या   कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने अशा लोकांना मदत करण्याची ग्वाही दिली असून अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.  

PM मोदी आता व्हिडीओच्या माध्यमातून संदेश देणार!

तीन दिवसांपासून उपासमारीचा सामना करत असणाऱ्या कुटुंबातील तीन बहिनींनी थेट पंतप्रधान कार्यालयात फोन करत आपली व्यथा मांडल्याचे समोर आले आहे. बिहारमधील भागलपूर परिसरातील खंजरपूरमधील मुलींनी पंतप्रधान कार्यालयात कॉल केला. त्यानंतर दिल्ली पासून ते भागलपूरच्या प्रशासनाने त्वरित लक्ष देवून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. खंजरपूर स्थित विषहरी जवळ वास्तव्यास असलेल्या गौरी कुमारी, आशा कुमारी आणि कुमकुम कुमारी या मुली आई-वडिलांच्या निधनानंतर घरकाम करुन उदरनिर्वाह करतात. पण लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

तबलिगी जमातवरुन ए आर रहमान म्हणाला...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बहिणी ज्या ठिकाणी कामाला जात होत्या त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना कामावर येऊ नये, असे सांगितले. त्यामुळे जगायच कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यामुळे तिघी बहिणींनी थेट पंतप्रधान कार्यालयात फोन करुन आपली व्यथा मांडली. पंतप्रधान कार्यालयातून तात्काळ हालचाली करत राज्य प्रशासनाशी संपर्क साधून त्यांचा प्रश्न सोडवण्यात आला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या भोजनाची जबाबदारी प्रशासनाने घेतली असून त्यांना प्रतिदिन जेवण दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hunger girls from bhagalpur Bihar dial Prime minister office and officer arrange food for them