पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAAविरोधात दिल्लीत आणखी एक रस्ता बंद, जाफराबाद येथे आंदोलन

CAAविरोधात दिल्लीत आणखी एक रस्ता बंद, जाफराबाद येथे आंदोलन

दिल्लीतील जाफराबादमध्ये ५०० पेक्षा अधिक महिला आंदोलकांनी सीएए-एनआरसीला विरोध दर्शवण्यासाठी रस्ता बंद केला आहे. आंदोलक मोठ्या संख्येने असल्याने जाफराबाद मेट्रो स्थानक बंद करण्यात आले आहे. जाफराबाद मेट्रो स्थानकाचे एंट्री आणि एक्झिट गेट बंद करण्यात आले असल्याचे दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने सांगितले आहे.

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प बाहुबली होतात...पाहा व्हिडिओ

महिला आंदोलनकर्त्यांनी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सरकारी नोकरीत कोटा आणि पदोन्नतीत आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याच्या विरोधात भीम आर्मीने भारत बंद पुकारला आहे. 

गायक मिकासिंहच्या महिला मॅनेजरची आत्महत्या

सीएएवरुन जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने महिला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहून पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा दले तैनात केली आहेत. शनिवारी रात्री उशिरा आंदोलन सुरु झाल्यापासून महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह मोठ्यासंख्येने सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे. 

आंदोलनकर्त्यांनी सीलमपूरमधील मौजपूर आणि यमुना विहारला जोडणारा मार्ग क्रमांक ६६ रोखला आहे. आंदोलनस्थळी एकही महिला पोलिस कर्मचारी नसल्याचा दावा, आंदोलकांनी केला आहे. सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनाला आणखी तीव्र करण्यासाठी एकत्र आल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hundreds of women protesting against Citizenship amendment act in Jaffrabad support Bharat Bandh