आकाशात घोंगावणारं हे 'वटवाघळांचं वादळ' पाहून ऑस्ट्रेलियामधील नगहाममधील स्थानिक चिंतेत पडले आहे. दररोज सांयकाळी लाखोंच्या संख्येनं वटवाघळं आकाशात उडताना दिसत आहेत, वटवाघळांची वाढती संख्या इथल्या स्थानिकांना चिंतेत टाकत आहे.
कोरोनाच्या फैलावाने धोकादायक बनलेल्या देशांच्या यादीत भारत या स्थानी
क्वीन्सलँडमधील अत्यंत छोट्या गावात गेल्या काही महिन्यात वाटवाघळांची संख्या वाढली आहे. हे वटवाघूळ इथे फ्रुट बॅट किंवा प्लाईंग फॉक्स म्हणूनही ओळखले जातत. नगहाम अत्यंत लहानसं गाव आहे. इथे महिन्याभरात त्यांची संख्या ३ लाखांहून अधिक झाली आहे. आजूबाजूला नजर जाईल तिथे ही वटवाघळं घोंगावताना दिसत आहे त्यामुळे स्थानिक काळजीत आहेत.
संध्याकाळच्या वेळी लाखोंच्या संख्येनं बाहेर पडणाऱ्या या वटवाघळांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या मर्यादेपलीकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे काही विपरीत परिणाम होणार नाही ना याची काळजी स्थानिकांना सतावत आहे.
पाकमध्ये गव्हाचे पीठ ७० तर साखर ७४ रुपये किलो, महागाई गगनाला भिडली