पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नव्या विषाणूमुळे सावधानतेचा इशारा, फ्लूसारखीच लक्षणे

नवा कोरोना व्हायरस

एका नव्या विषाणू (व्हायरस) संसर्गाची लागण होण्याची शक्यता चीनमधील आरोग्य विभागाने वर्तविली आहे. अर्थात या विषाणूचा खूप मोठा धोका नाही, असेही विभागाने स्पष्ट केले. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून, १२ पेक्षा अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. चीनच्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्टयानिमित्त अनेक जण परदेशात प्रवास करणार आहेत. या सर्व नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना तेथील सरकारने केल्या आहेत.

'व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग'

कोरोना व्हायरसची एका रुग्णामुळे दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता कमी आहे. तरीही या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. कोरोना व्हायरसमुळे रुग्णांना श्वसनाचा त्रास होतो. त्याचबरोबर फ्लूमध्ये दिसणारी सर्व लक्षणे याही आजारामध्ये दिसतात. 

चीनमधील वुहान प्रांतातील एक पर्यटक थायलंडला गेला होता. त्यावेळी तिथे त्याला या विषाणूची लागण झाल्यामुळे त्याच्यावर बँकॉकमध्ये सध्या उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेनंतर चीनने आपल्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. वुहान प्रांतातूनच थायलंडला गेलेल्या आणखी तीन जणांनाही ताप आल्यामुळे त्यांनाही रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. पण त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध, जामिनास कोर्टाचा नकार

जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये काही कुटुंबातील सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. येत्या काळात आणखी काही लोकांना याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषाणूची एका व्यक्तीमुळे दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता कमी असल्याचेही आरोग्य संघटनेने स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Humans could become vectors for new coronavirus but risk low say China health authorities