पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जागतिक मानवतावादी दिवसानिमित्त टि्वट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे पूर्णपणे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच काश्मीरमध्ये मानवाधिकार आणि शांततेसाठी आपण प्रार्थना करु, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आणखी एक टि्वट केले. त्या म्हणाल्या की, मानवाधिकार हा एक असा विषय आहे, जो माझ्या अत्यंत जवळचा आहे. १९९५ मध्ये कारागृहात झालेल्या मृत्यूप्रकरणी मानवाधिकाराच्या बचावासाठी २१ दिवसांपर्यंत मी रस्त्यांवर उतरले होते.

आता काँग्रेस नेत्यानेही केलं कलम ३७० हटवण्याचे स्वागत

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता केवळ श्रीनगरमधील प्राथमिक शाळा सुरु होतील. ज्या भागात शाळा सुरु होणार आहेत. त्यामध्ये लासजान, सांगरी, पंथ चौक, नौगाम, राजबाग, जवाहर नगर, गंगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणि शाल्टेंगचा समावेश आहे. परिस्थिती सामान्य होताच हळूहळू इतर क्षेत्रातील शाळा सुरु होतील. काश्मीर खोऱ्यात निर्बंध सैल करण्यात आले आहेत. स्थानिक अधिकारी आढावा घेत आहेत. लवकरच आणखी काही भागातील निर्बंध हटवले जातील.