पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगातील दीड लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे, ८० % जणांना रुग्णालयाची नाही गरज

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूमुळे जगात दहशत निर्माण झाली आहे. हा विषाणू ज्या वेगाने पसरत आहे, ते अत्यंत भीतीदायक आहे. परंतु, कोरोना विषाणूचा अर्थ मृत्यू हा नाही. जगात आतापर्यंत सुमारे ७ लाख २२ हजार लोक कोरोनाबाधित झाले आहे. यापैकी ३३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ५१ हजार लोक पूर्णपणे बरे झाले असून ते सामान्य आयुष्य जगत आहेत. 

अशीही मदत..., वडिलांच्या तेराव्याऐवजी गरिबांना केले अन्नदान

ज्या ५ लाख ३६ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये ५ लाख ९ हजार म्हणजेच ९५ टक्क्यांचा आजार कमी किंवा मध्यम दर्जाचा आहे. ५ टक्के रुग्ण म्हणजेच २६ हजार जणांची प्रकृती गंभीर आहे. या आकडेवारीवरुन स्पष्ट होते की या आजारात बहुतांश रुग्ण हे बरे होतात. 

वायफळ खर्च टाळा, काटकसर करा, शरद पवार यांचा सल्ला

भारतात किती रुग्ण झाले बरे

भारतात मागील २४ तासांत कोरोना विषाणूमुळे १०६ पेक्षा जास्त प्रकरणे समोर आले आहेत. त्यानंतर कोविड-१९ च्या प्रकरणांनी १००० आकडा पार केला आहे. देशात या विषाणूमुळे २७ जणांचा बळी गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात कोविड-१९च्या सक्रिय प्रकरणांची संख्या ९०१ झाली आहे. तर ९५ लोक बरे झाले आहेत. इतरांवर उपचार सुरु आहे. 

भारतीय चाहत्यांनी वॉर्नरला दिला 'रामायण-महाभारत' पाहण्याचा सल्ला

८० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनाबाधित ८० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. लोकांना हलका ताप जाणवतो. ते लवकर बरे होतात. तर २० टक्के लोकांना सर्दी, अंगदुखी, तापासारखी गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांपैकी केवळ ५ टक्के जणांनाच पुढील उपचारांची गरज भासते. यामध्ये नवीन औषधे दिली जातात.