पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुमची हिंमत कशी झाली? १६ वर्षांच्या कार्यकर्तीचा नेत्यांना सवाल

ग्रेटा थनबर्ग

वातावरणातील बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढतं प्रदूषण  यांसारख्या अनेक समस्यांवर दुर्लक्ष करत चाललेल्या जगातील नेत्यांना तुमची हिंमत कशी झाली?, असा रोखठोक सवाल विचारण्याचं धाडस केलंय स्वीडनमधील १६ वर्षांची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिनं. ग्रेटाचं भाषण, तिचे रोखठोक सवाल, पर्यावरणाविषयी कळकळ व्यक्त करणारं तिचं भाषण सोशल मीडियावर  चर्चेचा विषय ठरलं आहे. 

शिक्षक- गावकऱ्यांनी केवळ ५० रुपयांत बांधला पूल

संयुक्त राष्ट्रांची पर्यावरणातील बदलावर चिंता व्यक्त करणारी परिषद होणार आहे. या परिषदेसाठी जगभरातले नेते उपस्थित राहणार आहेत. या सर्व नेत्यांना ग्रेटानं  आपल्या भाषणातून खडे बोल सुनावले आहेत. 'पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. वातावरणातील बदलांसाठी आपणच कारणीभूत आहोत. ही समस्या अत्यंत गंभीर आहे. माझ्यासोबत येणाऱ्या पिढीला या समस्येचे गंभीर  परिणाम भोगावे लागणार आहेत', याची जाणीव तिनं  करुन दिली. 

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मागे

नव्या पिढीकडून तुमच्या अपेक्षा आहेत, मात्र नेत्यांनी केवळ खोटी आश्वासनं दिली आहेत. वातावरणातील बदलांसाठी कोणतंही ठोस पाऊल उचललं गेलं नाही किंवा ज्या उपाययोजना राबवल्या जात आहेत त्या पुरेशा नाहीत. जर हे असंच सुरू राहिलं तर आपला विनाश अटळ आहे, ही चिंता देखील १६ वर्षांच्या ग्रेटानं व्यक्त केली आहे.