पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणातील दोषींना माफ करा, इंदिरा जयसिंह यांचे आवाहन; आशादेवी भडकल्या

आशादेवी

निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींना फाशीच्या शिक्षेची नवीन तारीख जाहीर झाली आहे. एक फेब्रुवारी सकाळी ६ वाजता या प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवले जाईल. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला दोषींना माफ करण्याचे आवाहन केले आहे. २०१२ मधील दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई आशादेवी यांना इंदिरा जयसिंह यांनी सर्व दोषींना माफ करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आशादेवींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मला सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत ? संपूर्ण देश दोषींना फाशी देऊ इच्छितो. अशा लोकांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. मी त्यांना कदापी माफ करणार नाही. देवाने जरी मला सांगितले तरी मी त्यांना माफ करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

ट्रम्प फेब्रुवारीत भारतात, गुजरातमध्ये 'हाऊडी मोदी'सारखा कार्यक्रम

इंदिरा जयसिंह यांनी टि्वट करत आवाहन केले. दिल्लीच्या एका न्यायालयाने चार दोषींना फाशीची तारीख बदलली. तेव्हाच निर्भयाची आई आशादेवी यांनी निराशा जाहीर केली होती. त्यानंतर वकील इंदिरा जयसिंह यांनी हे आवाहन केले. 

त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, आशीदेवींचे दुःख मला माही आहे. मी त्यांना आग्रह करेन की त्यांनी सोनिया गांधींचं अनुकरण करावे. त्यांनी नलिनी यांना माफ केले. आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण मृत्यूदंडाच्या विरोधात आम्ही आहोत. 

यावर आशादेवी म्हणाल्या की, मला विश्वास बसत नाही की असा सल्ला देण्याची इंदिरा जयसिंह यांनी हिंमतच कशी केली. गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयात त्यांची अनेकवेळा भेट झाली. पण एकदाही त्यांनी आमच्याविषयी चौकशी केली नाही आणि आज त्या दोषींसाठी बोलत आहेत. असे लोक बलात्काऱ्यांचे समर्थन करुन आपली उपजिविका सुरु ठेवतात. त्यामुळेच बलात्काराच्या घटना थांबलेल्या नाहीत.

मी बेळगावला येतोय, पाहू काय घडतंयः संजय राऊत