पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा लावला पोलिसांनी नराधमांचा छडा

हैदराबाद बलात्कार प्रकरण

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैदराबाद बलात्कार प्रकरणानं देश पुन्हा हादरला. हैदराबादमधील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्याच्या घटनेनं देश सून्न झाला आहे. चारही आरोपींनी तिच्या दोनचाकी वाहनामधली हवा काढून मदत करण्याच्या बहाण्यानं तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पहाटे अर्धवट जळालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पोलिसांना हैदराबाद बंगळुरू महामार्गापासून दूर काही अंतरावर आढळला.

या प्रकरणातील चारही गुन्हेगारांना पोलिसांनी ३६ तासांच्या आत अटक केली होती. चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा पोलिस तपासासाठी शुक्रवारी पहाटे ३ वाजता आरोपींना गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत आरोपींवर गोळीबार केला. गोळीबारामध्ये चारही आरोपींचा खात्मा झाला. या गुन्हेगारांना पकडण्यात पेट्रोल पंपवरील कर्मचारी आणि टायर मॅकॅनिकनं पुरवलेली माहिती उपयोगी पडली आहे.  

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून दोन ग्रामस्थांची हत्या

असा लावला पोलिसांनी गुन्ह्यांचा छडा 
- शुक्रवारी पोलिसांना पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा फोन आला. गुरुवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास दोन व्यक्ती लाल रंगाच्या स्कुटीवरून पेट्रोल मागण्यासाठी आले होते, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. 
-  या स्कुटीचं वर्णन पीडित महिलेच्या स्कुटीशी अगदी मिळतं जुळतं होतं. 
- पीडित महिलेनं घटनेपूर्वी आपल्या बहिणीला फोन केला होता. तिनं ज्या वेळी फोन केला त्यानंतर काही तासांच्या  फरकानं स्कुटी घेऊन आरोपी पेट्रोल पंपवर आले होते.  पेट्रोल पंपवरच्या कर्मचाऱ्यानं सांगितली वेळ ही घटनेच्या आसपासची होती. 
-  कर्मचाऱ्यांनी आरोपींचं वर्णन ही केलं, हे वर्णन पोलिसांनी टिपलं.

हैदराबाद बलात्कार प्रकरण : 'निर्भया'च्या आईची विनंती

-  पेट्रोल देण्यास नकार दिल्यानंतर हे दोघंही शादनगरकडे निघून गेल्याची महत्त्वाची माहिती  कर्मचाऱ्यांनी दिली, या माहितीनंतर पोलिसांनी तपासाच्या कक्षा अधिक रुंदावल्या.
- त्यानंतर पोलिसांनी सर्व पेट्रोल पंप, मॅकॅनिक्स अशा सर्व ठिकाणी जिथे सीसीटीव्ही आहेत तिथे शोध घ्यायला सुरुवात केली. 
- त्यानंतर एका मॅकॅनिकनं दोन व्यक्तीनीं लाल रंगाच्या स्कुटीमध्ये बुधवारी उशीरा रात्री हवा भरल्याचंही सांगितलं. 
-  पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना लॉरी दिसल्या.
- पीडित महिलेनं  घटनेपूर्वी आपल्या बहिणीला फोन केला होता त्यात लॉरीचा उल्लेख तिनं केला होता. पोलिसांना टोल नाक्यापासून ३०० किलोमीटर दूर लॉरी दिसल्या. मात्र पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये लॉरीचे क्रमांक निट दिसले नाही कारण हे फुटेज रात्रीचे होते.
- पोलिसांनी त्याच दिवशीचे म्हणजेच बुधवारी सकाळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना लॉरीचे क्रमांक मिळाले. 

मंत्र्याना बंगल्याचे वाटप जाहीर; या ठिकाणी राहणार हे मंत्री

- पोलिसांनी नंबर प्लेटच्या आधारे लॉरीच्या मालकाचा तपास घेतला. या लॉरीचे मालक श्रीनिवास रेड्डी होते. रेड्डी यांनी लॉरीचे चालक आणि क्लिनरची माहिती पोलिसांना सांगीतली मोहम्मद अरिफ, झोलू श्रीरनी, झोलू नवीन, चेन्ना केशवल्लू हे क्लीनर आणि चालक होते. रेड्डी यांनी त्यांचा मूळ पत्ताही सांगितला. त्याच आधारे पोलिसांनी आरोपींना पकडलं. चौघांनी शुक्रवारी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. 
- महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर तिचा मृतदेह त्यांनी ब्लँकेटमध्ये गुंडाळून निर्जन स्थळी आणून जाळला. इतकं नाही मृतदेह जळाला की नाही याची खातरजमा करुन घेण्यासाठी ते  पुन्हा आले होते अशी माहितीही पोलिसांनी दिली.