पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: कर्नाटकात पावसामुळे घर पत्त्यांसारखे कोसळले

कर्नाटकात घर कोसळले

कर्नाटकामध्ये पावसाने कहर केला आहे. गेल्या सहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटकातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, कर्नाटकातील शेकडो वर्ष जुने घर पत्त्यांसारखे कोसळल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मूसानंतर दहशतवादी संघटना सांभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ कर्नाटकच्या होसुरु गावातील आहे. असे सांगितले जात आहे की, मुसळधार पावसानंतर घर पत्त्यांसारखे कोसळले. या गावात राहणारे ग्रामस्थ लांब उभे राहून पाहत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी घर पडत असतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला. 

सौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

जीर्ण अवस्थेत दिसणारे हे घर अवघ्या काही सेकंदातच जमीनदोस्त झाले. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची पळापळ झाली. या दुर्घटनेमध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, पावसामुळे पालार क्षेत्रातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. पूराच्या पाण्यात रस्ते वाहून गेले आहेत. तर या पावसामुळे आतापर्यंत कर्नाटक राज्यातील १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात १८ दहशतवादी ठार

हवामान खात्याने उत्तर आणि दक्षिण कर्नाटकमध्ये पुढच्या तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवत रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचसोबत केरळमध्ये सुध्दा पावसामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे. कर्नाटकातील नारायणपूर छाया भगवती मंदिर परिसरात पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे भाविकांचा तारंबळ उडाली.

विधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर