पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दलितांवर अत्याचार केल्याचा राजस्थानातील व्हिडिओ भीषण - राहुल गांधी

राहुल गांधी

राजस्थानमधील दोन दलितांचा छळ करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडिओ भीषण असल्याचे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. या प्रकरणी त्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारला दोषींवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. 

T20 WC 2020: डान्समुळे पाक महिला क्रिकेटर ट्रोल, पाहा व्हिडिओ

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थानातील नागौरमध्ये दोन दलितांवर अत्याचार करीत त्यांचा छळ केला जात असल्याचा व्हिडिओ भीषण आहे. राज्य सरकारने या प्रकरणी दोषींचा शोध घेऊन लगेचच त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मी मागणी करतो. 

हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या व्हिडिओमध्ये दोन दलितांना काही लोक मारहाण करीत असल्याचे त्याचबरोबर त्यांच्यावर स्क्रूड्रायव्हरने हल्ला करीत असल्याचे दिसते. हल्लेखोरांपैकीच एकाने हा व्हिडिओ चित्रित केला आहे.

'कट, कॉपी, पेस्ट'चे संशोधनकर्ते लॅरी टेस्लर यांचे निधन

हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर राजस्थानमधील भाजपने तेथील काँग्रेस सरकारवर टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे ट्विट केले आहे.