पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'डॉक्टर अन् त्यांच्या स्टाफवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा'

अमित शहा

कोरोनाविरोधातील लढ्यात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांची गय करु नका, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भातील देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवण्यात आले असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने वैद्यकीय सेवा देणाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी अशा सूचनाही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.  

कोविड-१९ : इस्त्रायल पंतप्रधानांची PM मोदींकडे सहकार्याची विनंती

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने हेल्पलाइन सेवा (मदत केंद्र) सुरु केले आहे. याशिवाय १९०३ आणि १९४४ हे दोन क्रमांकही सक्रीय आहेत. तत्पूर्वी  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात जनसेवा करणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरील अनुचित प्रकार सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कोरोना विषाणूच्या विरोधातील लढा जिंकण्यासाठी मेहनत घेत असलेल्या पोलिस प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाला जनतेने सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीचा प्रकार उघडकीस

लॉकडाऊनच्या दरम्यान पोलिस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर देशमुख यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. कोरोनाविरोधातील लढाईत मैदानात असलेल्या पोलिस आणि आरोग्य कर्मऱ्यांच्या कार्य हे अभिमानास्पद आहे, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला होता.