पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना केंद्राचा सावधानतेचा इशारा

संग्रहित छायाचित्र

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केला जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपानंतर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशासाठी सावधानतेचा इशारा जारी केला आहे. उद्या, गुरुवारी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होते आहे. त्यामुळे यावेळी काही जणांकडून हुल्लडबाजी आणि गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे, असे सरकारने म्हटले आहे. 

व्हीव्हीपॅटबाबतची विरोधकांची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली

मंगळवारी बिहारमध्ये माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी जर लोकांनी दिलेला कौल फिरवण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात होईल, असा इशारा दिला होता. त्यांच्या याच इशाऱ्यानंतर केंद्र सरकारने दक्षतेचा इशारा जारी केला. दरम्यान, उपेंद्र कुशवाह यांच्या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही उत्तर दिले आहे. आम्हाला सुद्धा जशास तसे उत्तर देता येते, असे रामविलास पासवान यांनी म्हटले आहे. काल नवी दिल्लीमध्ये अमित शहा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. त्यानंतर रामविलास पासवान यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी सर्व राज्य सरकारांनी पुरेशी खबरदारी घ्यावी. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. जिथे मतमोजणी केली जाणार आहे आणि जिथे ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत. तिथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था ठेवावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

EVMला विरोध करणाऱ्या पक्षांना अमित शहांचे ६ प्रश्नं

समाजातील विविध नेत्यांकडून आणि घटकांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यांना ही सूचना देण्यात आली असल्याचे केंद्राने स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Home Ministry alerts all states about possible violence during counting of votes tomorrow