पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'... म्हणून मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याची तीव्रता कमी झाली होती'

अमित शहा

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन ठिकाणी (हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) खासगी सुरक्षारक्षकांनी सुरुवातीला दहशतवाद्यांचा प्रतिकार केला होता. त्यामुळेच दहशतवादी हल्ल्याची तीव्रता काहीशी कमी झाली होती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. मंगळवारी नवी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या हस्ते खासगी सुरक्षा एजन्सीसाठी परवाना देण्याच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले.

युतीचे जागावाटप हे भारत-पाक फाळणी इतके क्लिष्टः संजय राऊत

कोणत्याही एजन्सीने खासगी सुरक्षारक्षकांची भरती करताना काही मापदंड निश्चित केले पाहिजेत. ज्यांनी लष्करी सेवेत काम केले आहे किंवा एनसीसीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना भरती करताना प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे सांगून अमित शहा म्हणाले, खासगी सुरक्षारक्षकांचे पोलिस पडताळणी करण्याचे सर्वात मोठे आव्हान होते. पण आता त्यावरही मार्ग काढण्यात आला आहे. आता देशातील ९० टक्के पोलिस ठाणी इंटरनेटने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे पोलिस पडताळणी करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे ज्याला आपण सुरक्षारक्षक म्हणून भरती करतो आहोत, त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे सुनिश्चित होणार आहे.

'अयोध्येप्रती हिंदूंच्या श्रद्धेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अशक्य'

आज सुरू करण्यात आलेली वेबसाईट येत्या तीन महिन्यांत सर्व भारतीय भाषांमध्ये सुरू होईल. यामुळे परवाना जारी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:home minister amit shah told why the terrorists loss of capacity decreased during the 26 11 attack