पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'CAA समर्थनार्थ रॅलीमुळे दिल्ली हिंसाचार घडला असे म्हणता येणार नाही'

अमित शहा

दिल्ली हिंसाचारात जाळपोळ करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. एवढेच नाही तर सीएएच्या समर्थनार्थ रॅलीमुळे दिल्ली पेटली नाही, असेही शहांनी म्हटले आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्यावर लोकसभेत आज (बुधवार) चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी या मुद्यावरुन भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान अमित शहा बोलत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग करत निषेध नोंदवल्याचे पाहायला मिळाले.  

लोकांना घाबरवत का आहात, राज ठाकरेंचा सवाल

अमित शहा म्हणाले की, दिल्लीतील हिंसाचारामध्ये जाळपोळ करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. ज्यांनी जाळपोळ केली त्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल, असे शहा यावेळी म्हणाले. दिल्लीतील हिंसाचाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. दुर्भाग्यपूर्ण घटनेला विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यापासूनच देशातील युवकांना भडकवण्याचे काम सुरु आहे. असेही ते यावेळी म्हणाले.  

भाजपकडून उदयनराजेंसह आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी

 २४ फेब्रुवारीपूर्वी सीएएच्या विरोध करणाऱ्यांपेक्षाही अधिक सीएएला समर्थन देणाऱ्या रॅली निघल्या आहेत. त्यामुळे समर्थन करणाऱ्या गटामुळे दंगल भडकली हे म्हणणे योग्य ठरणार नाही. १४ डिसेंबरला रामलीला मैदानात काँग्रेसची रॅली झाली. घरातून बाहेर पडून आरपारची लढाई लढण्याची भाषा करण्यात आली. त्यानंतर १६ डिसेंबरपासून शाहिन बागचे आंदोलन सुरु झाले. दिल्ली हिंसाचाराच्या दरम्यान पैसे वाटण्यात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये भिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व गोष्टींची चौकशी सुरु असून लवकरच यासंदर्भातील गोष्टी बाहेर येतील, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Home Minister Amit Shah speech on delhi violence he target opposition party and again supou