पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकांसाठी बहुपयोगी ओळखपत्र तयार करणे शक्य - अमित शहा

अमित शहा

व्यक्तिगत ओळखपत्र, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट हे दस्तावेज म्हणून वापरता येईल, असे बहुपयोगी एकमेव ओळखपत्र तयार केले जाऊ शकते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिली. पण त्याचवेळी असे ओळखपत्र भारतीय नागरिकांसाठी तयार करण्याचा कोणताही प्रस्ताव तूर्त सरकारपुढे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फक्त हे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी अशा पद्धतीचे ओळखपत्र तयार करण्याचा प्रस्ताव मागे ठेवला होता.

कंपनी करात कपातीचा निर्णय साहसी, महाराष्ट्राला फायदाच - मुख्यमंत्री

भारताच्या रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या शिलान्यासाचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

भारतातील नागरिकांसाठी ओळखपत्र जारी करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन होते. पण यूपीए सरकारच्या काळात आधार कार्डची संकल्पना पुढे आल्यानंतर हाच दस्तावेज ओळखपत्र म्हणून वापरण्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर वेगळे ओळखपत्र जारी करण्याची संकल्पना मागे पडली होती. पण अमित शहा यांनी पुन्हा एकदा त्याची आठवण करून दिली आहे. 

बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे पुन्हा सक्रीय - लष्करप्रमुख

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची प्रक्रिया सध्या काही राज्यांमध्ये सुरूच आहे. नागरिकत्व कायद्यातील तरतुदींप्रमाणे प्रत्येक नागरिकाला त्याची नोंदणी करावी लागणार लागेल आणि त्यानंतर त्याला एक ओळखपत्र दिले जाईल. यासाठी सरकारला आधी नागरिकत्व नोंदणी करावी लागणार आहे.